Header ad

ई श्रम कार्ड ची नोंदणी कशी करायची ? या कार्डचे फायदे काय आहेत E Shram Card Information In Marathi

 करोनाच्या काळात असंघटीत कामगारावर मोठा परिणाम झालेला आहे , त्यामुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी असंघटीत कामगारासाठी ई श्रम कार्ड योजना सुरु केली आहे .या योजनेचा सर्व असंघटीत शेत्रातील कामगार लाभ घेऊ शकतात . या योजने मागे सरकारचा मुख्य उद्देश असंघटीत क्षेत्रातील लोकाबद्दल माहिती मिळवणे व अशा लोकांना सरकारी योजनाचा लाभ मिळवून देणे हा आहे.(E-Shram Card Information In Marathi)




ई श्रम कार्ड योजनेचे फायदे  -  E-Shram Card Benefits In Marathi

ई श्रम कार्ड योजने अंतर्गत असंघटीत क्षेत्रातील कामगारांना राष्ट्रीय पेन्शन योजना , प्रधान मंत्री जीवन ज्योती विमा योजना , प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजना , सार्वजनिक वितरण प्रणाली ,अटल पेन्शन योजना , प्रधान मंत्री आवास योजना ,राष्ट्रीय सामाजिक सहायता योजना प्रधान मंत्री कौशल विकास योजना, आयुष्मान भारत , प्रधानमंत्री रोजगार सृजन योजना या सर्व योजनाचा लाभ दिला जाईल.

ई श्रम कार्ड नोंदणी नंतर त्या व्यक्तीला २ लाख रुपयापर्यंत लाभ होऊ शकतो. तसेच नोंदणीकृत व्यक्तीला प्रधानमंत्री अपघात विमा योजनेचा लाभ मिळणार आहे. त्याचा कालावधी एक वर्षाचा असेल. तसेच अपघाती मृत्यू किंवा कायमचे अपंगत्व आल्यास २ लाख रुपये देण्यात येतील.

आपत्कालीन व राष्ट्रीय महामारीच्या काळात आवश्यक सहयोग मिळवण्यासाठी याचा वापर केला जाईल.


असंघटीत कामगार कोण आहेत 

देशाच्या कोणत्याही कोपर्यातील काम गार जे असंघटीत क्षेत्रात काम करतात ते ई श्रम कार्ड साठी अर्ज करू शकतात. बांधकाम क्षेत्रातील कामगार, स्थलांतरित मजूर, फेरीवाले, घर कामगार, स्थानिक रोजंदारी कामगारांसह, भूमिहीन शेतमजूर व इतर काही असंघटित कामगार असे सर्व असंघटीत कामगार या योजनेचा लाभ घेऊ शकतात.


या योजनेचा लाभ कोण घेऊ शकत नाही 

ई श्रम कार्ड योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी हि सूचना तुम्हला माहित असली पाहिजे .जर असंघटीत क्षेत्रातील काम गार करदाता असेल तर त्या व्यक्तीला ई श्रम योजनेसाठी अर्ज करता येत नाही. जो कामगार EPFO, ESIC व NPS चा सदस्य नाही ती व्यक्तीच या योजनेसही अर्ज करू शकते.


ई श्रम कार्ड योजनेसाठी पात्रता 

  • अर्ज करणारी व्यक्ती असंघटीत क्षेत्रातील कामगार असला पाहिजे.
  • अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय कमीतकमी १६ ते जास्तीत जास्त ५९ असायला हवे.
  • अर्ज दाता आयकर देणारा नसावा 
  • अर्ज दाता EPFO, ESIC व NPS चा सदस्य नसावा.


ई श्रम कार्ड आवश्यक कागद पत्रे 

  • दोन पासपोर्ट साईज फोटो 
  • अधार कार्ड 
  • मोबाईल नुंबर 
  • बँक पासबुक व अकाउंट नंबर 
  • राशन कार्ड 

ई श्रम कार्ड नोंदणी कशी करायची . ई श्रम कार्ड ऑनलाईन कस काढायचं 

ई श्रम कार्ड योजनेचा लाभ घेण्यासाठी याच्या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करावी लागते.या साठी तुम्ही ई श्रम कार्ड योजनेच्या पोर्टल वर घरबसल्या नोंदणी करू शकता किंवा जवळच्या सिएसपी सेंटर किंवा सेतू केंद्रावर जाऊन नोंदणी करू शकता.ई श्रम पोर्टलवर निशुल्क नोंदणी केली जाईल.
नोंदणी केल्यानंतर अर्ज दात्याला एक UAN नंबर दिला जातो. हा १२ अंकी नंबर नोंदणी प्रक्रियेनंतर सर्व असंघटीत कामगाराला दिला जातो. हा नंबर जीवनभर वैध मानला जाईल. अर्ज दात्याला खाते सक्रीय करण्यासाठी वर्ष भरातून एकदा खात्याला अपडेट करावे लागेल.

ई श्रम कार्ड नोंदणीसाठी खालील स्टेप्स फोलो करा.

१. सर्वप्रथम ई श्रम कार्ड योजनेच्या अधिकृत वेबसाईट ला ओपन करा 

२. या नंतर होम पेज वरती Register On E Shram या पर्याय निवडा 

३. या नंतर तुमच्या समोर सेल्फ रेजीस्ट्रेशन फोर्म ओपन होईल 

४. या मध्ये तुमचा मोबाईल नंबर टाकून ओटीपी प्रविष्ट करा व  वेरीफाय करून घ्या 

५. यानंतर तुमचा आधार नंबर टाकून ओटीपी ने आधार वेरीफाय करून घ्या 

६. या नंतर कंटिन्यू टू आधार डीटेल्स वरती क्लिक करून तुमची वयक्तिक माहिती भरा.

७. यानंतर तुमचा पत्ता , शैक्षणिक योग्यता , बँक तपशील व इतर आवश्यक माहिती व्यवस्थित भरा.

८. शेवटी ई श्रम कार्ड डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढून सुरक्षित ठेऊन द्यायची आहे.




ई श्रम कार्ड विषयीचे महत्वाचे प्रश्न 

१. ई श्रम कार्ड नोंदणीची शेवटची तारीख काय आहे ? 

ई श्रम कार्ड नोंदणीची किंवा योजनेची कोणतीही शेवटची किंवा अंतिम तारीख नाही. अर्ज करणारी व्यक्ती कधीही ई श्रम कार्डच्या पोर्टल वर अर्ज करू शकते.

२.ई श्रम कार्ड बनवण्यासाठी फी किती आहे ? 

ई श्रम कार्ड बनवण्यासाठी सरकारकडून कोणतीही फी आकारली जात नाही. ई श्रम कार्ड नोंदणी निशुल्क केली जाते.

ई श्रम कार्ड साठी वयोमर्यादा काय आहे ? 

ई श्रम कार्ड योजनेसाठी अर्ज दात्याचे वय १६ ते ५९ वर्ष असायला पाहिजे.

ई श्रम कार्ड किती दिवसासाठी वैध आहे 

ई श्रम कार्ड जीवनभरा साठी वैध आहे. म्हणजेच ई श्रम कार्ड ची वैधता लाईफटाईम आहे.






टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या