Header ad

१२ वी नंतर काय करावे ? 12 vi nantar kay karave ? Best Courses After 12th in Marathi


भविष्यात चांगले करीअर घडवण्यासाठी योग्य दिशेकडे वाटचाल करणे खूपच म्हत्वाचे आहे. आज काल विद्यार्थी त्यांचे शालेय शिक्षण सहज पूर्ण करतात पण १२ वी नंतर काय करावे व काय नाही याविषयी त्यांच्या मनात अनेक शंका असतात. योग्य मार्गदर्शन नसल्यामुळे अनेक वेळा विद्यार्थी चुकीचे निर्णय घेऊन पश्चाताप करत बसतात. पण आज आम्ही तुम्हाला १२ वी नंतर काय करावे या विषयी माहिती देत आहोत (12 vi Nantar Kay Karave )



१२ वी नंतर तुम्ही कोणताही विषय निवडताना तुमची आवड व रुची व तसेच तुमच्या १२ वी च्या विषयाला अनुसरून पुढील करीअर निवडायला पाहिजे. म्हणजेच पुढे चालून तुम्हाला अभ्यास सोपा वाटला पाहिजे. म्हणजेच तुम्ही आर्ट्स विषयात  १२ वी पास केली असेल तर आर्ट्स मधेच पुढील शिक्षण घ्यायला पाहिजे, जर तुम्ही कॉमर्स मध्ये १२ वी पूर्ण केली असेल तर पुढे कॉमर्स विषयाला अनुसरून करीअर निवडायला पाहिजे आणि जर तुम्ही १२ सायन्स मधून पूर्ण केली असेल तर तुम्ही डॉक्टर किंवा इंजिनिअर या विषयाकडे जायला पाहिजे. 

चला तर मग पाहूया १२ वी आर्ट्स नंतर , १२ वी कॉमर्स नंतर आणि १२ वी सायन्स नंतर काय करावे.


१२ वी आर्ट्स नंतर काय करावे (12 vi Arts Nantar Pudhe Kay Karave )

१२ वी ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर सर्वात मोठा प्रश असतो कि १२ वी नंतर काय करावे. पुढे कोणता कोर्स करावा कोणता पर्याय निवडावा १२ वी आर्ट्स नंतर हा प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात असतो. कारण योग्य पर्याय निवडणे हे तुमच्या यशस्वी जीवनासाठी खूपच महत्वाचे असते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा कि नेहमी असा पर्याय निवडा जो कि तुमच्या आवडीचा असला पाहिजे व त्यामध्ये तुम्हाला रुची असली पाहिजे. १२ आर्ट्स नंतर अनेक पर्याय आहेत ते पुढीलप्रमाणे 

१. १२ वी आर्ट्स नंतर बी.ए . करू शकता ( BA - Bachelar Of Arts )-

१२ वी आर्ट्स नंतर तुम्ही पुढील शिक्षण घेत असाल तर तुम्ही BA म्हणजेच ब्याचलर ऑफ आर्ट्स मध्ये पदवी चे शिक्षण पूर्ण करू शकता व यानंतर तुम्ही कोणत्याही कंपनी मध्ये नोकरी करू शकता.

२. १२ वी नंतर मास कम्युनिकेशन एंड जर्न लिस्ट मध्ये करीअर बनवू शकता 

जर तुम्हाला मास कम्युनिकेशन एंड जर्न लिस्ट म्हणजेच पत्रकार क्षेत्रात रुची असेल तर तुम्ही या क्षेत्रात तुमचे करीअर बनवू शकता व पुढे चालून या क्षेत्रात तुम्हाला चांगला जॉब मिळू शकतो त्यामुळे हा तुमच्या साठी एक उत्तम पर्याय आहे.

३ १२ आर्ट्स नंतर तुम्ही लॉ ( LAW )करू शकता 

जर तुम्हाला वकील बनायचे असेल तर तुम्ही १२ वी आर्ट्स नंतर लॉ ( LAW ) मध्ये शक्षण पूर्ण करू शकता हा देखील तुमच्या साठी एक उत्तम पर्याय असू शकतो.

४.बचलर ऑफ सोशल वर्क (BSW) करू शकता 

जर तुम्हाला समाज सेवेमध्ये रुची असेल तर तुम्ही BSW म्हणजेच बचलर ऑफ सोशल वर्क या मध्ये पदवी चे शिक्षण पूर्ण करू शकता. अनेक सामाजिक क्षेत्रात तुम्हाला चांगला चांगला जॉब मिळू शकतो. तसेच या मध्ये पुढे चालून तुम्ही मास्टर डिग्री पूर्ण करू शकता.

५. स्पर्धा परीक्षेची तयारी करू शकता.

१२ वी नंतर तुम्हाला पुढे शिक्षण घ्यायचे नसेल तर तुम्ही १२ वी नंतर SSC सारख्या स्पर्धा परीक्षेची तयारी शकता व परीक्षा पास करून सरकारी क्षेत्रात नोकरी मिळवू शकता.


१२ वी कॉमर्स नंतर काय करावे ? ( १२ Vi Commerce Nantar Kay Karave )

कॉमर्स हा एक चांगला पर्याय आहे करिअर बनवण्यासाठी जर तुम्ही १२ वी कॉमर्स मधून उत्तीर्ण झाला असाल तर तुमच्या पुढे अनेक करिअर बनवण्यासाठी  अनेक पर्याय आहेत . 

१. १२ वी कॉमर्स नंतर बी . कॉम  (B.COM ) करा 

जर तुम्हाला कॉमर्स विषयात पुढे  करीअर करायचे असेल तर तुमची कोणत्याही कोलेज मध्ये बी. कॉम  साठी प्रवेश घेऊ शकता . हा कोर्स ३ वर्षाचा असतो. बी.कॉम मधून तुम्ही तुमची डिग्री पूर्ण करून कोणत्याही कंपनी मध्ये नोकरी करू शकता.

२.बँकिंग अंड इन्शुरन्स ( BBI ) हा कोर्स करा 

१२ वी कॉमर्स उत्तीर्ण केल्या नंतर तुम्ही BBI म्हणजेच ( Bachelor of Commerce and Banking and Insurance ) हा कोर्स करू शकता , यामध्ये तुम्हाला बँकिंग आणि इन्शुरन्स बद्दल शिकवले जाते. हा कोर्स पूर्ण केल्या नंतर तुम्हाला कोणत्याही बँकेत सहज नोकरी मिळून जाते.

३.१२ वी नंतर चार्टर्ड अकौंटंट  ( CA ) करा.

१२ वी कॉमर्स नंतर चार्टर्ड अकौंटंट हा कोर्स करून तुम्ही ( CA ) बनू शकता व एक चांगल्या पगाराची नोकरी करू शकता. हा खूपच लोक प्रिय कोर्स आहे , अनेक कॉमर्स चे विद्यार्थी हाच कोर्स करायला प्राधान्य देतात.


४. कंपनी सेक्रेटरी चा कोर्स करू शकता  

जर तुम्हाला एका मोठ्या कंपनीमध्ये चांगल्या पगाराची नोकरी करायची असेल तर व मोठ्या नामाकीत कंपनीमध्ये सेक्रेटरी पदाची नोकरी करायची असेल तर तुम्ही कंपनी सेक्रेटरी चा कोर्स करू शकता 
.

५. बॅचलर  ऑफ बिजनेस एडमिनीस्टेटर (BBA) करा    

जर तुम्हाला पुढे चालून एक बिजनेस बनायचं आहे व तुम्हाला बिजनेस विषयी अधिक जाणून घ्यायचे आहे तर तुम्ही १२ वी नंतर  BBA हा कोर्स करू शकता. हा एक चांगला पर्याय आहे.

६. बॅचलर  ऑफ मनेजमेंट स्टडीज ( BMS ) करा 

१२ वी नंतर हा पर्याय देखील एक उत्तम पर्याय आहे. हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला अनेक मोठमोठ्या कंपनी मध्ये नोकरी मिळू शकते.या मध्ये देखील तुम्ही चांगले करीअर घडवू शकता.

७. स्पर्धा परीक्षेची तयारी करा 

१२ नंतर तुम्हाला पुढे शिकायची इच्छा नसेल आणि तुम्हाला सरकारी नोकरी करायची असेल तर तुम्ही SSC EXAM ची तयारी करू शकता.हि परीक्षा पास करून तुम्ही सरकारी नोकरी करू शकता .




१२ वी सायन्स (science)नंतर काय करावे - 12th Science Nantar Kay karave

जसे कि आपल्याला तर माहिती आहेच कि सायन्स तेच विध्यार्थी घेतात ज्यांना १० वी मध्ये चांगले मार्क्स असतात व हे विध्यार्थी अभ्यासात पुढे असतात तसेच हा थोडा अवघड विषय असतो. यामधे पुढे चालून विद्यार्थी डॉक्टर व इंजिनिअर बनतात पण या शिवाय तुम्ही १२ वी सायन्स नंतर खालीलपैकी कोर्स करू शकता.

१ . १२ वी सायन्स नंतर बी टेक ( B.Tech )करा

१२ वी नंतर तुम्हाला कंप्यूटर इंजिनिअर , मेकॅनिकल इंजिनिअर, सिव्हिल इंजिनिअर बनायचे असेल तर तुम्ही बी टेक ला प्रवेश घेतला पाहीजेत.

२. पीएमटी ( PMT ) साठी अप्लाय करू शकता.

जर तुम्ही १२ वी बायोलॉजी विषया सहीत उत्तीर्ण झाला आहात आणि तुम्हाला डॉक्टर बनायचे असेल तर तुम्ही पीएमटी ( PMT) म्हणजेच प्री मेडिकल टेस्ट ( Pre Medical Test ) साठी अप्लाय करू शकता. ही परीक्षा पास करून पुढे डॉक्टर चे शिक्षण घेऊ शकता.

३.१२ वी नंतर बॅचलर ऑफ सायन्स (BSC) करा.

जर तुम्हाला सायन्स मधे पुढे शिक्षण घ्यायचे असेल आणि तुम्हाला तुमचे ग्रॅज्युएशन सायन्स विषयात पुर्ण करायचे असेल तर तुम्ही बॅचलर ऑफ सायन्स ( बीएससी )ला प्रवेश घेऊ शकता.

४.१२ वी नंतर नेशनल डिफेंस सर्विस ( NDA )करू शकता.

१२ वी नंतर तुम्हाला NDA करायची इच्छा असेल तर तुम्ही करु शकता यामधे तुम्ही नेवी (Navy), आर्मी फोर्स (Army Force)एअर फोर्स ( Air Force ) या सारख्या पदावर काम मिळवू शकता.



टिप : वरीलपैकी कोणत्याही कोर्स मधून तुम्ही तुमचे चांगले करीअर घडवू शकता. फक्त तुम्ही तोच विषय निवडायला पाहीजे ज्या विषया मधे तुम्हाला रूचि आहे.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या