राष्ट्रीय इलेक्ट्रोनिक व प्राद्योगिक संस्थान (National Institute of Electronic And Information Technology )
च्या द्वारे डिजिटल साक्षरता अभियान ला चालना देण्यासाठी आज आपल्या देशात अनेक कॉम्पुटर कोर्स घेतले जात आहेत. जसे कि ACC, BCC, CCC, CCC+,ECC इत्यादी. यापैकी CCC (सीसीसी ) हा एक लोकप्रिय कोर्स आहे. तर आज आपण CCC कोर्स काय आहे व या कोर्स चे काय फायदे आहेत .या विषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
CCC चा फुल फॉर्म काय आहे -CCC Full Form In Marathi
CCC - Course On Computer Concept
CCC कोर्स काय आहे - CCC Course Information in Marathi
CCC हा एक कॉम्पुटर कोर्स आहे व हा एक शासनाद्वारे प्रमाणित कोर्स आहे , या कोर्स चा उदेश सामान्य लोकांना कॉम्पुटर चे प्रशिक्षण देऊन डिजिटल साक्षरता वाढवणे हा आहे . जेणे करून आपल्याला दैनंदिन जीवनात कॉम्पुटर चा योग्य पद्धतीने वापर करता यावा. CCC हा कोर्स आज काल सरकारी नोकरी साठी अनिवार्य करण्यात आलेला आहे , त्यामुळे जर तुम्हाला सरकारी नोकरी करायची इच्छा असेल तर हा कोर्स करणे तुमच्या साठी आवश्यक आहे.
CCC कोर्स साठी पात्रता -
CCC कोर्स साठी कोणतीही पात्रता आवश्यक नाही , हा कोर्स कोणताही विद्यार्थी किंवा सामान्य व्यक्ती करू शकते. या साठी कोणतीही शिक्षणाची किंवा वयाची अट ठेवलेली नाही.
CCC कोर्स कसा व कुठे करायचा -
CCC कोर्स ची संपूर्ण प्रक्रिया हि ऑनलाइन असते , या मध्ये प्रवेश घेण्यापासून ते प्रमाणपत्र मिळण्यापर्यंत ची संपूर्ण प्रक्रिया हि ऑनलाईन असते.
त्यामुळे हा कोर्स तुम्ही स्वतः करू शकता किंवा कोणत्याही शासनमान्य संस्थे मध्ये प्रवेश घेऊन देखील करू शकता.
पण स्वतः हा कोर्स केल्याने तुम्हाला अनेक अडचणीचा सामना करावा लागतो पण एखाद्या संस्थे कडून हा कोर्स केल्या नंतर या कोर्स ची सर्व प्रक्रिया संस्थेद्वारे केली जाते व तुम्ही सहजतेने हा कोर्स पूर्ण करू सकता.
CCC कोर्स ची फीस किती आहे -
CCC कोर्स ची फीस ५०० रुपये आहे व या सोबतच GST कर वेगळा द्यावा लागतो .
पण जसे कि आम्ही तुम्हाला अगोदरच सांगितले आहे कि हा कोर्स तुम्ही डायरेक्ट स्वतः करू शकता किंवा संस्थेद्वारे पण करू शकता
जर तुम्ही स्वत हा कोर्स करत असाल तर तुम्हाला ५०० रु + GST फीस द्यावी लागते . पण जर तुम्ही एखाद्या संस्थेद्वारे हा कोर्स करत असाल तर तुम्हाला या कोर्स ची हि फीस तर द्यावीच लागते पण सोबतच त्या संस्थेची प्रशिक्षण फीस पण द्यावी लागते.
CCC कोर्स साठी वय किती असायला पाहिजे -
जसे कि आम्ही तुम्हाला अगोदरच सांगितले आहे कि हा कोर्स कुणीही करू शकतो तसेच हा कोर्स तुम्ही कोणत्याही वयात करू शकता. या कोर्स साठी कमीत कमी व जास्तीत जास्त अशी कोणतीही वयाची अट दिलेली नाही .
CCC कोर्स परीक्षेचे स्वरूप -
CCC कोर्स ची परीक्षा पूर्ण पाने ऑनलाईन घेतली जाते. पेपर १०० मार्काचा असतो ज्यासाठी ९० मिनिटाचा वेळ दिलेला असतो ,
तसेच या मध्ये कोणतीही निगेटिव मार्किंग चा नियम लागू नाही. प्रत्येक प्रश्नाला एक गुण असतो .
परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी तुम्हाला ५० गुण आवश्यक असतात. परीक्षा झाल्याने १५ दिवसाने तुमचा निकाल जाहीर केला जातो.
CCC कोर्स करणे गरजेचे आहे का -
CCC शासनमान्य कॉम्पुटर कोर्स आहे तस तर हा कोर्स करणे गरजेचे नाही पण जर तुम्हाला सरकारी नोकरी करायची असेल तर तुम्ही CCC कोर्स करणे गरजेचे आहे कारण आज काल सरकारी नोकरी साठी हा कोर्स अनिवार्य करण्यात आला आहे.
पण जर तुम्ही फक्त कॉम्पुटर शिकण्यासाठी म्हणून तुम्ही हा कोर्स करत आहात तर तुम्ही MS-CIT ह अकोर्स देखील करू शकता.
CCC कोर्स व M-CIT कोर्स मध्ये काय फरक आहे ?
CCC हा एक राष्टीय दर्जाचा कोर्स आहे व MS-CIT हा एक राज्य शासनाचा कोर्स आहे . त्या
जर तुम्ही महाराष्ट्र राज्यात नोकरी करत असाल तर MS-CIT चे प्रमाणपत्र नोकरीसाठी देऊ शकता पण जर तुम्ही आपल्या देशात कुठेही सरकारी नोकरी साठी अर्ज केला तर तिथे CCC कोर्स चे प्रमाण पत्र मागितले जाते.
0 टिप्पण्या