Header ad

MSW कोर्स बद्दल संपुर्ण माहिती MSW Course Information in Marathi

MSW हा कोर्स त्या तरुण वर्गासाठी खूपच खास आहे ज्या तरुणाला  समाज कार्य करण्यासाठी इच्छा आहे. जर तुम्हाला पण समाज सेवा करायला आवडत असेल  तर तुम्ही MSW हा कोर्स करू शकता. पण तुम्हाला वाटत असेल कि समाज कार्याचा कोर्स आहे तर मग फ्री मध्ये समाज सेवा करावी लागणार . पण तसे नसून हा कोर्स केल्या नंतर तुम्हाला चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकते. चला तर मग पाहूया MSW कोर्स काय आहे व कसा करावा ( MSW Course Information in Marathi )




MSW कोर्स काय आहे ( What is MSW Course Information In Marathi )

MSW हा सामाजिक सेवा क्षेत्रातील एक कोर्स आहे. हा कोर्स करून तुम्ही सामाजिक क्षेत्रात तुमची मास्टर डिग्री पूर्ण करू शकता व कोणत्याही सामाजिक संस्थेमध्ये नोकरी करू शकता. हा कोर्स करायला खूप सोपा आहे व हा कोर्स केल्यानंतर तुम्ही अनेक क्षेत्रात काम मिळवू शकता. 


MSW चा फुल फॉर्म "मास्टर ऑफ सोशल वर्क" असा आहे - Full Form OF MSW
  • M- Master Of 
  • S- Social
  • W - Work


MSW कोर्स मधील स्कोप व  करीअर च्या संधी -

MSW हा कोर्स केल्यानंतर तुम्ही विविध पदावर नोकरी करू शकता .हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला खाजगी व तसेच शासकीय समाज कल्याण विभागात खालील पदावर नोकरी मिळू शकते.
  • महिला व बाल कल्याण विभाग 
  • मानव संसाधन विभाग 
  • सामाजिक कार्यकर्ता 
  • NGO व्यवस्थापक 
  • NGO मध्ये प्रकल्प अधिकारी 
  • सहायक शिक्षक 
  • सामाजिक न्याय व रोजगार  विभाग 


MSW कोर्स साठी आवश्यक पात्रता -

BSW हा कोर्स करण्यासाठी १० वी किंवा १२ वी पास असणे आवश्यक आहे, व MSW हा कोर्स करण्यासाठी कोणत्याही शाखेतून कमीत कमी ५०% गुनांसह पदवी पास असणे आवश्यक आहे.


MSW कोर्स चा कालावधी -

BSW या बैचलर कोर्स चा कालावधी हा 3 वर्षाचा असतो तर MSW या कोर्स चा कालावधी २ वर्षाचा असतो. या कोर्स मध्ये तुम्हाला ४ सेमिस्टर असतात.


MSW कोर्स ची फीस - MSW Course Fees

MSW हा कोर्स करण्यासाठी तुम्हाला प्रतिवर्ष १५ टे २० हजार फीस लागू शकते पण तुम्ही हा कोर्स कोणत्या कॉलेज मध्ये करता त्यावर हे अवलंबून असते कारण शासकीय कॉलेज मध्ये फीस खूप कमी असतो व खाजगी कॉलेज मध्ये फीस ज्यास्त असतो .


MSW कोर्स चा अभ्यासक्रम - MSW Syllabus In Marathi

MSW कोर्स २ वर्षाचा असतो व या मध्ये ४ सेमिस्टर असतात व प्रत्येक सेमिस्टर मध्ये वेगवेगळ्या विषयावर अभ्यास कराव लागतो. MSW कोर्स मध्ये शिकवले जाणार विषय हे खालील प्रमाणे आहेत 
  • समाज सेवा ( Social Work )
  • सामाजिक संघटना ( Community Organization )
  • महिला व बाल विकास ( Woman And Child Devlopment )
  • भारतिय समाजाचे विश्लेषण (Analysis OF Indian Sociaty )
  • सामाजिक सेवा व न्याय( Social Work And Justice)


MSW कोर्स ची प्रवेश प्रक्रिया -

MSW कोर्स ला प्रवेश हा विद्यार्थ्याच्या गुणवत्तेच्या आधारावर दिला जातो.पण काही कॉलेज मध्ये प्रवेश परीक्षा व मुलाखतही घेतली जाते.



MSW कोर्स केल्यानंतर पगार किती मिळतो.

MSW कोर्स केल्यानंतर तुम्हाला खाजगी क्षेत्रात पगार कमी असतो पण सरकारी क्षेत्रात पगार अधिक असतो. सामान्यपणे हा कोर्स केल्या नंतर तुम्हाला १५,००० ते ३०,००० पर्यंत पगार मिळतो.


MSW करण्यासाठी महाराष्ट्रातील काही उत्तम कॉलेज लिस्ट - MSW Course in Marathi Medium College

  • कर्वे इन्स्टीट्युट ऑफ सोशल सर्विस ,पुणे 
  • कॉलेज ऑफ सोशल वर्क निर्मला निकेतन , मुंबई 
  • डॉ.आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क ,वर्धा 
  • वालचंद कॉलेज ऑफ आर्ट्स अंड सायन्स , सोलापूर 
  • छत्रपती शाहू इन्स्टीट्युट , कोल्हापूर 

तर मित्रानो जर का तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर हि माहिती तुमच्या गरजू मित्र मैत्रीनि सोबत शेअर करायला विसरू नका.




टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या