Header ad

DMLT कोर्स विषयी संपूर्ण माहिती DMLT Course Information In Marathi

  जर तुम्हाला वैद्यकीय क्षेत्रात विशेष करिअर बनवायचे असेल तर या पोस्ट  मध्ये आम्ही तुम्हाला एका खूपच महत्वपूर्ण कोर्स विषयी माहिती देत आहोत. तो म्हणजेच DMLT कोर्स. तर मित्रानो आज आपण  DMLT कोर्स काय आहे व कसा करायचा याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. ( DMLT Course Information In Marathi )


DMLT course information in Marathi


या पोस्ट मध्ये दिलेली माहिती -

  • DMLT कोर्स काय आहे.
  • DMLT चा फुल फॉर्म 
  • DMLT  कोर्स मध्ये करीअर च्या संधी 
  • DMLT कोर्स चा कालावधी 
  • DMLT कोर्स साठी पात्रता
  • DMLT कोर्स ची फीस 
  • DMLT  कोर्स नंतर पगार किती मिळतो. 
  • DMLT कोर्स साठी उत्तम कॉलेज लिस्ट 


 DMLT कोर्स काय आहे -  DMLT Course Information In Marathi 

  DMLT हा कोर्स पेरामेडीकॅल चा कोर्स आहे . हा कोर्स २ वर्षाचा असतो. DMLT हा मेडिकल लॅब टेक्नॉलॉजीस्ट चा डिप्लोमा कोर्स आहे. हा कोर्स केल्या नंतर तुम्हाला लॅब टेक्निशिअन या पदावर नोकरी मिळते. हि नोकरी तुम्हाला खाजगी व शासकीय अशा दोनही क्षेत्रात मिळू शकते.


DMLT फुल फॉर्म - डिप्लोमा इन मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी ( Diploma In Medical Lab Technology ) असा आहे.

जर तुम्हाला वैद्यकीय क्षेत्रात करीअर बनवायचे असेल हा कोर्स तुमच्या साठी एक चांगला पर्याय आहे. कारण या कोर्स ची फीस पण कमी आहे व या कोर्स मध्ये करीअर स्कोप चांगला आहे.


DMLT मध्ये करीअर च्या संधी - Careear Scope In DMLT Information In Marathi

 मागील काही वर्षापासून या कोर्स ला अनेक जणांची पसंती मिळत आहे कारण , हा कोर्स केल्या नंतर विद्यार्थ्याला सहज कोणत्याही हॉस्पिटल किंवा पैथालोजी लब मध्ये नोकरी मिळून जाते.  तुम्ही कोणत्याही हॉस्पिटल व हेंल्थ केअर सेंटर मध्ये टेक्निशिअन चा जॉब करू शकता, इतकेच नाही तर तुम्ही कोणत्याही कॉलेज , युनिवर्सिटी व रिसर्च सेंटर मध्ये देखील लब टेक्निशिअन ची नोकरी करू शकता. 


DMLT कोर्स चा कालावधी किती असतो-

DMLT कोर्स चा कालावधी हा २ वर्षाचा असतो .


DMLT कोर्स साठी आवश्यक पात्रता-

DMLT कोर्स साठी तुम्हाला १२ वी पास असायला हवे , तसेच तुम्ही १२ वी  विज्ञान (Science ) शाखेतून पूर्ण केलेली असावी. तसेच तुम्हाला PCB या विषयामध्ये ५०% पेक्षा अधिक गुण असणे आवाश्यक आहे.

पण काही कॉलेज मध्ये १० वी पास वर देखील DMLT हा कोर्स करता येतो. तसेच काही कॉलेज मध्ये DMLT या कोर्स ला प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षा द्यावी लागते तर काही कॉलेज मध्ये तुमच्या मार्क्स च्या आधारावर प्रेवेश दिला जातो.

 जर तुम्हला शासकीय कॉलेज मध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्हाला Entrance Exam द्यावी लागते. जर तुम्हाला enrance exam द्यायची नसेल तर तुम्ही कोणत्याही खाजगी कॉलेज मध्ये प्रवेश घेऊ शकता. म्हणजे च DMLT कोर्स ची पात्रता वेगवेगळी असू शकते.


DMLT कोर्स साठी फीस किती असते- 

DMLT कोर्स च्या फीस विषयी सांगायचं झाल तर तुम्ही हा कोर्स कोणत्या कॉलेज मधून करता त्यावर हे अवलंबून आहे. कारण शासकीय कॉलेज मध्ये या कोर्स साठी खूप कमी फीस असते, तर खाजगी कॉलेज मध्ये या कोर्स साठी ४० ते ५० हजार प्रतिवर्ष इतकी फीस आकारली जाते.


DMLT कोर्स पूर्ण केल्यानतर पगार किती मिळतो 

अनेक जनाच्या मनात हा प्रश्न असतो कि कोर्स पूर्ण केल्या नंतर नोकरी मध्ये पगार किती मिळतो.
DMLT कोर्स पूर्ण केल्या नंतर सुरवातीला १०,००० ते १२००० इतका पगार असतो, पण जसे जसे तुम्हाला कामाचा अनुभव येईल तसा तुमचा पगार वाढतो व तुम्हाला ३०,००० ते ३५,००० पर्यंत पगार मिळू शकतो.



DMLT अभ्यास क्रम - DMLT Syllabus In Marathi 
  1. शरीरशास्त्र (Anatomy)- शरीरशास्त्र मध्ये तुम्हाला शरीरचे अवयव व  हाडे याविषयी शिकवले जाते.
  2. सूक्ष्मजीवशास्त्र (MicroBiology)- सूक्ष्मजीव शास्त्र मध्ये तुम्हाला विषानुशास्त्र , परजीवी विज्ञान, बुरशी याविषयी शिकवले जाते.
  3.  Physiology-  शरीरविज्ञान मध्ये आपल्याला विविध महत्वाच्या अवयवां बद्दल शिकवले जाते 
  4. .Pathalogy- पॅथालोजी मध्ये आपल्याला नमुने गोळा करणे , आरबीसी गणना , लेबलिंग , अहवाल पाठवणे व अहवाल देणे शिकवले जाते 
  5.  जीवन शास्त्र (BioChemistry)- मूत्र व मल ची रासायनिक तपासणी , शेंद्रीय रसायनशास्त्र ,जैवरासायनिक नमुना संग्रह , अजैविक रसायन शास्त्र , द्रावण तयार करणे या बद्दल शिकवले जाते 

DMLT करण्यासठी कॉलेज लिस्ट -

  1.  के पी पॅरामेडीकल इन्स्टिट्यूट, पुणे 
  1.  ग्लोबल हेंल्थ केअर कॉलेज ऑफ नर्सिंग, नाशिक
  1.  कोहिनूर पॅरामेडीकल कोलेज ऑफ सायन्स, मुंबई 
  1.  शासकीय वैद्यकीय विद्यालय , लातूर 
  1.  श्री साई पाॅलीटेक्निक कॉलेज , चंद्रपूर 

 DMLT कोर्स काय आहे व कसा करायचा हे आता तुमच्या लक्षात आलेच असेल , या शिवाय तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या