Header ad

मोठ मोठ्या इमारतीला हिरव्या रंगाच्या कपड्याने का झाकले जाते ?

तुम्हाला माहित आहे का मोठ मोठ्या इमारतीला हिरव्या रंगाच्या कापडाने का झाकले जाते ? आज काल जागोजागी मोठ मोठ्या इमारतीचे बांधकाम होताना दिसत आहेत . या इमारतीला मोठमोठ्या मशीन्स आणि क्रेन च्या मदतीने बनवले जाते आहे . आज काल कुठे हि आपल्याला मोठमोठ्या मशीन्स दिसतात त्यावरून आपण अंदाज लावत असतो कि तिथे काहीतरी मोठ्या स्वरूपाचे बांधकाम चालू आहे .

 पण या बांधकामाच्या ठिकाणी अजून एक वस्तू आपल्याला बगायला मिळते ती म्हणजेच हिरव्या रंगाचा कपडा , बांधकामाच्या ठिकाणी हिरव्या रंगाच्या कपड्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो , जिथे जिथे मोठमोठ्या इमारतीचे बांधकाम चालू आहे तिथे त्या इमारतीला हिरव्या कापडाने झाकले जाते , तर तुम्ही कधी विचार केलाय का या कामासाठी हिरव्या रंगाच्या कापडाचा च का वापर केला जातो ? 

तुम्हाला माहित नसेल तर काही हरकत नाही आज आम्ही तुम्हाला याविषयीची महत्वपूर्ण माहिती देणार आहोत.




मोठमोठ्या बांधकामाच्या ठिकाणी इमारतीला हिरव्या रंगाच्या कापडाने झाकण्या मागे अनेक करणे आहेत जसे कि , इतक्या उंचीवर काम करणार्या कामगराचे लक्ष विचलित होऊ नये व तसेच इतक्या उंचीवर काम करताना त्याला भीती वाटू नये नाहीतर अचानक एखादी दुर्दैवी घटना घडू शकते .

याशिवाय जे बाहेरचे लोक आहेत ते सुध्धा बाहेरून या इमारतीला  बघत असतात अशावेळी त्या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारावर कोणत्याही प्रकारचे मानसिक दडपण येऊ नये यासाठी देखील इमारतीला कापडाने झाकले जाते.


हिरव्या रंगाच्या कापडाने झाकन्या मागचे सर्वात मोठे कारण 

तुम्हाला तर माहित असेलच कि बांधकामाच्या ठिकाणी धूळ , माती आणि बांधकामाचे साहित्य उडत असतात ,यामुळे आजु बाजूच्या लोकांना या गोष्टीचा त्रास होऊ शकतो . त्यामुळे लोकांना अश्या समस्यांचा सामना करावा लागू नये यासाठी अशा इमारतीला हिरव्या कापडाने झाकले जाते . जेणेकरून बांधकामाच्या ठिकाणची धूळ व माती उडून दुसरीकडे जाणार नाही.


पण हिरव्या रंगाच्याच कपड्याचा वापर का केला जातो ?

आता असा प्रश्न निर्माण होतो कि हिरव्या रंगाच्या कपड्याचा च का वापर केला जातो इमारतीला झाकण्यासाठी दुसर्या कोणत्याही रंगाच्या कापडाचा वापर का नाही केला जात, कदाचित तुम्हाला माहिती नसेल पण हिरवा रंग हा दुरूनही सहज निदर्शनास येतो व तसेच रात्रीच्या वेळी हिरवा रंग हा थोड्याशा प्रकाशातही परावर्तीत होतो . त्यामुळे इमारतीला झाकण्यासाठी हिरव्या रंगाच्या कापडाचा वापर केला जातो. 

याशिवाय तुम्ही पाहिलं असेल कि उन्हाळ्यात अनेक लोक उन्हापासून बचाव करण्यासाठी या हिरव्या रंगाच्या कपड्याचा वापर करतात व घरावर व दुकानावर हा कपडा बांधतात. त्यामुळेच उन्हाळ्यात उन्हापासून बचाव करण्यासाठी देखील या हिरव्या रंगाच्या कापडाचा उपयोग होतो.


तर मग आता तुमच्या लक्षात असेलच कि मोठमोठ्या इमारतीचे जिथे बांधकाम होत असते आणि जर  तिथे आजूबाजूला लोक राहत असतील तर कोणालाही त्रास होऊ नये यासाठी इमारतीला हिरव्या रंगाच्या कापडाने झाकले जाते .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या