Header ad

बीसीए (BCA) कोर्स काय आहे व कसा करावा ? जाणून घ्या संपूर्ण माहिती BCA Information In Marathi

      आपण १२ वी पर्यंतचे शिक्षण कसेतरी पूर्ण करतो पण १२ वी नंतर पुढे काय करावे याबद्दल अनेक जन गोंधळात पडतात पण आपल्या भविष्याचा विचार करून योग्य निर्णय घेणे खूपच महत्वाचे आहे 

आजकाल प्रत्येक क्षेत्रात कॉम्प्युटर चा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच आजकालच्या विद्यार्थ्याची पण कॉम्प्युटर मध्ये अधिक रुची दिसून येत आहे. त्यामुळे  आजकाल अनेकजण  बीसीए कोर्स ला पसंती दर्शवत आहेत पण  बीसीए कोर्स काय आहे कसा करावा , यासाठी पात्रता काय आहे , फीस किती लागते व  बीसीए कोर्स करण्यासाठी काय करावे अशी माहिती आपल्याला असणे गरजेचे आहे त्यामुळे आज आम्ही तुम्हाला बीसीए (BCA) कोर्स काय आहे व कसा करावा ( BCA Course Information In Marathi ) याबद्दल ची माहिती देत आहोत. 




BCA information in Marathi
BCA information in Marathi



आपण या पोस्ट मध्ये पाहणार आहोत :

* बीसीए कोर्स काय आहे 

* बीसीए कोर्स चा कालावधी 

* बीसीए कोर्स साठी आवश्यक पात्रता 

* बीसीए कोर्स साठी फीस 

* बीसीए कोर्स मध्ये काय शिकवले जाते 

* बीसीए कोर्स नंतर नोकरी च्या संधी 

* बीसीए कोर्स नंतर पुढे काय करावे 


 *बीसीए कोर्स काय आहे - BCA Course Information In Marathi

 बीसीए हा एक कॉम्प्युटर शी संबंधित एक डिग्री कोर्स आहे. जर कोणत्याही विद्यार्थ्याला कॉम्प्यूटर व  कॉम्प्युटर ऍप मध्ये रुची असेल तर तुमच्या साठी हा एक उत्तम पर्याय असू शकतो. जर तुम्हाला संगणकीय क्षेत्रात करीअर करायचे असेल तर  बीसीए हा कोर्स तुम्ही करू शकता 



 बीसीए चा फुल फॉर्म  Full form of BCA in marathi 

BCA - Bachelor Of Computer Applications  ( बचलर ऑफ कॉम्पुटर ॲपलीकेशन्स )




* बीसीए कोर्स चा कालावधी 

 बीसीए कोर्स हा ३ वर्षाचा असतो .  बीसीए हा एक ३ वर्षाचा पदवी अभ्यासक्रम आहे .




*  बीसीए कोर्स साठी पात्रता 

 बीसीए कोर्स करण्यासाठी कोणत्यही शाखेतून १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .  बीसीए कोर्स करण्यासाठी १२ विज्ञान शाखेतूनच उत्तीर्ण असले पाहिजे असे काही नाही तुम्ही कोणत्याही शाखेतून १२ वी उत्तीर्ण झालेले असाल तरी चालते.

तसेच  बीसीए ला प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला १२ वी मध्ये ५० % पेक्षा अधिक गुण असणे आवश्यक आहे. या शिवाय काही कॉलेज मध्ये प्रवेश परीक्षा देखील द्यावी लागते. तर काही कॉलेज मध्ये गुणांच्या आधारावर प्रवेश दिला जातो.




 * बीसीए कोर्ससाठी फीस 

बीसीए कोर्स करण्यासाठी ५० हजार ते १ लाख रुपये प्रतीवर्ष इतका खर्च येतो. शासकीय कॉलेज मध्ये फीस खूप कमी असते तर खाजगी कॉलेज मध्ये फीस अधिक असते त्यामुळे तुम्ही बीसीए  कोठून करता यावर देखील फीस अवलंबून असते.

तसेच बीसीए ऑनलाईन व नियमित अशा दोन प्रकारे करता येते त्यामुळे तुम्ही 
ऑनलाईन बीसीए करताना व नियमित बीसीए करताना वेगवेगळी फीस आकारली जाते.




 * बीसीए कोर्स मध्ये काय शिकवले जाते 

* Software Devlopment - बीसीए मध्ये तुम्हाला सॉफ्टवेअर बनवणे व तसेच सोफ्ट वेअर म्यानेज कसे करायचे ते शिकवले जाते .

 Web Desining - बीसीए मध्ये तुम्हाला वेब डिजायनिंग म्हणजेच वेबसाईट बनवणे शिकवले जाते . तसेच ऐप बनवणे देखील शिउक्वले जाते.हा कोर्स केल्या नंतर तुम्ही एक उत्तम वेब डिजायनर बनू शकता.

* Computer Programming Language बीसीए मध्ये विविध प्रोग्रामिंग लँग्वेज शिकवल्या जातात या मध्ये मुख्यत: C, C++, Java, SQL इ . कॉम्प्युटर लँग्वेज शिकवल्या जातात.

* Computer network - एक कॉम्प्युटर दुसर्या कॉम्प्युटर ला कसा जोडला जातो या बद्दल चे संपूर्ण ज्ञान या कोर्स मध्ये शिकवले जाते .




*  बीसीए कोर्स नंतर नोकरीच्या संधी - 

 बीसीए कोर्स नंतर सरकारी क्षेत्रात नोकरी साठी खालील पोस्ट साठी अर्ज करू शकता 

* ऑपरेटर 

* प्रकल्प सहाय्यक

* तांत्रिक सहाय्यक 

* संगणक सहाय्यक

* प्रणाली अधिकारी  
 
बीसीए कोर्स नंतर खाजगी कंपनी मध्ये नोकरीच्या संधी 

* डाटा सायंटीस्ट 

* कॉम्प्युटर प्रोग्रामर 

* सॉफ्टवेअर डेव्हलपर 





बीसीए कोर्स नंतर पुढे काय करावे 

> MCA (मास्टर ऑफ कॉम्प्युटर ॲपलीकेशन्स )

> MBA (मास्टर ऑफ बिजनेस ॲपलीकेशन्स )

> MIM (माहिती व्यवस्थापनात पदव्युत्तर पदवी )

>MCM (मास्टर ऑफ कॉम्प्युटर मॅनेजमेंट )

> P.G.P.C.S. ( कॉर्पोरेट स्टडीज मधील पोस्ट ग्रॅजूएट प्रोग्राम )

> M.Sc (मॅनेजमेंट )

> M.Sc (IT)

>M.A. ( पत्रकारिता आणि जनसंवाद )



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या